ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमीन ए, डी, सी, ई आणि अँटीऑक्सीडंट्सही हे पोषक घटक असतात. आरोग्यासाठी गुणकारी असणारे ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी आणि केसांसाठीही उपयुक्त आहे. जाणून घ्या ऑलिव्ह ऑईलचे सौंदर्यवर्धक फायदे –

त्वचा मऊ, चमकदार बनते
त्वचा जर कोरडी पडली असेल तर ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. हे तेल चिकट नसल्याने त्वचेत सहज मुरत आणि त्वचेला मऊ, चमकदार बनवत. ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी उत्तम मॉईश्चराईजर आहे.

मेकअप रिमूव्हर
ऑलिव्ह ऑईल मेकअप रिमूव्हर करण्यासाठी वापरतात. कापसाच्या साहाय्याने ऑलिव्ह ऑईल चेहऱ्याला लावून मेकअप रिमूव्ह करावा.

डेड स्किन हटविण्यासाठी
ऑलिव्ह ऑईलमध्ये ब्राऊन शुगर आणि कॉफी पावडर मिक्स करून बॉडीला स्क्रब केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

टॅनिंग कमी करण्यासाठी
हाताचे कोपर काळे पडले असतील रोज रात्री झोपण्याआधी ऑलिव्ह ऑईलने ५-१० मिनिट मसाज करा. हा उपाय नियमितपणे करावा.

फूट क्रीम
तळपायाच्या भेगांवर ऑलिव्ह ऑईल लावल्यास फाटलेल्या टाचा मऊ होतील. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलने तळपायांची आणि टाचांची मालिश करावी.

नखे चमकदार आणि मऊ होतील
नखे जर खडबडीत, निस्तेज झाली असतील तर रात्री झोपताना नखांवर ऑलिव्ह ऑईल लावा. यामुळे नखे मऊ होतील.

केसांच्या समस्यांवर उपयुक्त
आठवड्यात दोनदा ऑलिव्ह ऑईलने केसांना मसाज करावी. त्यामुळे केसांना पोषण मिळून केस दाट, चमकदार, मजबूत आणि मऊ होतात. तसेच कोंडा, केस रुक्ष होणे, केसांना फाटे फुटणे, केस गळणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.