जायफळ हा स्वयंपाकघरामधील महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. विशेष करून पदार्थांला स्वाद आणि सुवास आणण्यासाठी जायफळाचा वापर केला जातो. जायफळामध्ये अँटीऑक्सीडंट, विटामिन्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुण, फायबर आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असतात. जाणून घ्या जायफळाचे उपयोग आणि फायदे –
पोटाच्या समस्यांवर गुणकारी
जायफळ खाल्ल्याने भूक वाढते. तसेच पोटासंबंधी रोग अर्थात बद्धकोष्ठ, गॅस, पोटामध्ये मुरड येणं आणि डायरियासारख्या समस्यांवर जायफळ गुणकारी आहे. गॅस अथवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास, जायफळ आणि लिंबाच्या रसाची पेस्ट बनवून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी ही पेस्ट दोन चमचे खा.
डोकेदुखी त्वरित कमी करते
पाण्यामध्ये अथवा कच्च्या दुधामध्ये जायफळ मिक्स करून त्याचा लेप डोक्याला लावल्यास डोकेदुखीपासून त्वरीत आराम मिळतो.
अनिद्रेवर गुणकारी
जायफळात ट्रायमाइरिसटिन नावाचं केमिकल असतं. त्यामुळे चांगली झोप येते. अनिद्रेची समस्या असेल तर चिमूटभर जायफळ खावं. चिमूटभर जायफळाची पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं मध घालून झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आधी खाल्ल्याने चांगली झोप येते.
सतत तोंड येत असेल तर
सतत तोंड येत असेल आणि ठीक होत नसेल तर जायफळ पाण्यामध्ये उकळवून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तोंडातील फोड कमी होतात.
सर्दीवर गुणकारी
एक ग्लास दूधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घालून प्यायल्यामुळे सर्दी कमी होते.
त्वचेच्या समस्यांवर गुणकारी
त्वचेवर सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर जायफळ गुणकारी आहे.
टीप : जायफळ गुणकारी जरी असले तरी त्याचा वापर मर्यादेतच करावा.