कांदा
दह्यासोबत किंवा दह्यामध्ये कांदा खाणे शरीरासाठी हानिकारक असते. दही थंड असते कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो. दह्यासोबत कांदा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील निर्मण होतात. अनेक लोक रायता किंवा कोशिंबिरीमध्ये दह्यामध्ये कांदा टाकतात. मात्र हे अयोग्य आहे.
आंबा
दही थंड आणि आंबा उष्ण असतो. त्यामुळे या दोघांना एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरात विषारी घटकांची निर्मिती होते. तसेच शरीरात सर्दी आणि उष्णता निर्माण होते. दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात.
उडीद डाळ
उडीद डाळ आणि दही एकत्र खाल्ल्यास पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. दही व उडीद डाळ एकत्र खाल्ल्यास त्यांचं विषामध्ये रूपांतर होतं.
दूध
दही आणि दूध एकत्र खाल्ल्याने पोटदुखी , ऍसिडिटी आणि गॅस सारख्या समस्या होऊ शकतात.
मासे
दोन प्रकारचे प्रोटीन स्त्रोत एकत्र कधीही खाऊ नयेत. दही आणि मासे एकत्र खाल्ल्याने पोटदुखीची समस्या उद्भवते.
इडली डोसा
इडली, डोसा हे पदार्थ दह्यासोबत खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. कारण दही देखील आंबट असते आणि इडली, डोसा हे पदार्थ आंबवून बनवले जातात.
तेलकट पदार्थ
तेलकट पदार्थ आणि दह्यासोबत खाल्ल्याने शरीर सुस्त बनते. तसेच पित्ताची समस्या देखील निर्माण होते.
कारले
दही व कारले भिन्न गुणधर्मी आहेत. ज्या दिवशी कारले खाल त्यादिवशी दही खाऊ नये.
चीज
दह्यासोबत चीज खाल्ल्याने दही मध्ये उपस्थित असणाऱ्या जीवाणूंना शरीरात चरबी पचन करण्यास अडचण येते. म्हणून दह्यासोबत चीज खाऊ नये.
केळ
केळ आणि दही एकत्र कधीच खाऊ नये. शिवाय केळ आणि दही खाण्यामध्ये एक-दोन तासांचा फरक असणे देखील आवश्यक आहे.