नैसर्गिकरित्या भुवया दाट करायच्या असतील तर खालील उपाय करा –
एरंडेल तेल
एरंडेल तेल भुवयांना लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा.
पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली भुवयाखालील त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि तिचे पोषणही करते. त्याच्यामुळे भुवयांवरील केस तुटण्याची शक्यता कमी होते. पेट्रोलियम जेली भुवयांवर लावा आणि मसाज करा. पेट्रोलियम जेली रात्रभर तशीच राहू द्या, सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
तिळाचे तेल
तिळाच्या तेलाचे काही थेंब हाताच्या बोटांवर घ्या आणि भुवयांवर मसाज करा.
कांद्याचा रस
कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.छोट्या कांद्याचा रस काढून भुवयांना लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
संतुलित आहार
प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि बायोटिनयुक्त पदार्थ जसे की अंडी, बदाम, दूध, पालक यांचा आहारात समावेश करा.
भरपूर पाणी प्या.
बदाम तेल
बदामाच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात जे केसांना पोषण देतात आणि केस मजबूत करण्यास मदत करतात. रात्री झोपताना आपल्या बोटांच्या टोकांवर बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि भुवयांवर तेलाचा मसाज करा. रात्रभर ठेवा आणि सकाळी स्वच्छ धुवा.