मुंबई : मुंबई पोलिस दलातील धारावी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकास 40 हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी ही लाचेची मागणी केली गेली होती.  सुरुवातीला एक लाख रुपये अथवा आय फोनची मागणी करत तडजोडीअंती पोलिस निरीक्षकाने 40 हजाराची लाच घेतली. विजय शिवदास माने असे अटक करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव असून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील धारावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार व त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तक्रारदारास पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची पोलिस निरीक्षक विजय शिवदास माने यांची भेट झाली. त्यावेळी माने यांनी दाखल गुन्ह्यातील कलम कमी करून देतो मात्र त्या बदल्यात एक लाख रूपये किंवा आय फोनच्या लोचेची मागणी केली.

दरम्यान, लाचेच्या मागणीनंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत पडताळणी करण्यात आली तेव्हा दि. 24 मार्च 2023 रोजी तडजोडीअंती पोलिस निरीक्षक विजय माने यांनी सरकारी पंचासमक्ष 40 हजार रूपयाची लाच घेतली. यावेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पडकले. याप्रकरणी माने यांच्याविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी खाल्लास राहालं ‘या’ चार आजारांपासून दूर