गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सर्वांनाच जेरीस आणलं आहे. कोरोनाविषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता म्युकरमायकोसिस या आजाराविषयी ऐकायला मिळत आहे. जाणून घ्या म्युकरमायकोसिस या आजाराविषयी माहिती
कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचं प्रमाण वाढतं आहे. ज्या रुग्णांना डायबिटीस आहे किंवा आयसीयूमध्ये अधिक काळ थांबलेले असताना ज्यांनी काळजी घेतली नाही अशा रुग्णांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
* म्यूकरमायकोसिस कसा होतो?
हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. आपल्या आजूबाजूला असलेली बुरशी आणि त्यांचे स्पोअर्स नाकाद्वारे किंवा एखाद्या जखमेवाटे शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. जर इम्युनिटी कमी असेल तर ही बुरशी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरते आणि अवयव निकामी करू लागते.
*म्युकरमायकोसिसची लक्षणं
डोळे किंवा नाक किंवा दोन्हींच्या आजूबाजूला लालसरपणा आणि वेदना होणे
ताप
डोकेदुखी
खोकला
दम लागणे
रक्ताच्या उलट्या
तणाव
*म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी ‘ही’ काळजी घ्या
धुळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या ठिकाणी जाताना मास्क वापरा.
मातीत काम करण्याआधी बूट, लांब पँट आणि लांब बाह्यांचा शर्ट आणि हातात ग्लोव्ह्ज घाला.
व्यक्तिगत स्वच्छता पाळा त्यासाठी संपूर्ण शरीर घासून अंघोळ करा.
*म्युकरमायकोसिस झाल्याचा संशय कधी घ्यावा?
नाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणे
चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, सूज येणे
दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे
अंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणे
छाती दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणेनाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणे
चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, सूज येणे
दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे
अंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणे
छाती दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे.
*काय करावं?
पायपरग्सुसेमिया नियंत्रित करणे
कोरोनातून बरं झाल्यावर आणि डायबेटीस असल्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळीवर लक्ष ठेवा.
योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधीप्रमाणे स्टेरॉईड घ्या.
ऑक्सिजन थेरपी घेताना स्वच्छ आणि उकळलेलं पाणी वापरा.
बुरशीविरोधी आणि अँटी बायोटिक काळजीने वापरा.
*काय करु नये?
लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असताना नाकबंद झालेल्या सर्वच रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचं समजू नका.
बुरशीचा संसर्ग झालाय की नाही याचा शोध घेण्यासाठी सखोल तपासण्या करा.
म्युकरमायकोसिसचा संशय आल्यानंतर किंवा तसं स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यासाठी उशीर करु नका.