शरीरातील उष्णता वाढणे, खूप वेळ उपाशी राहणं, रात्री उशिरा झोपणे, तेलकट-मसालेदार पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असणे, अधिक चहा पिणे, ब जीवनसत्वाचा अभाव, उष्ण वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे, अपचन यांसारख्या कारणांमुळे तोंड येण्याची समस्या निर्माण होते. काहींना विशेषतः उन्हाळा या ऋतूमध्ये तोंड वारंवार येण्याची समस्या निर्माण होते. तोंड येण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच काही घरगुती उपचार केल्यास या समस्येपासून आराम मिळतो.

तोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

दही
दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे पोटाची उष्णता कमी होते तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

तुळशीची पाने
तुळशीची पाने चावून खा. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स असतं. याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. यामुळे तोंडातील फोड, जखमा बऱ्या होतात.

तुरटी
तुरटीच्या पाण्याने चूळ भरा. तुरटीमध्ये अँटीबायोटीक्स असतं. तुरटीच्या पाण्याने चूळ भरल्याने तोंडाची आग होऊ शकते. मात्र या उपायाने वेदना कमी होतात आणि संसर्ग होत नाही.

लसूण
तोंड आल्यावर २ ते ३ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करा. ही पेस्ट तोंडातील फोडांवर,जखमेवर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याच्या गुळण्या करा.

मध
मधामध्ये अँटीबायोटीक्स असतं. तोंडातील फोडांवर किंवा जखमेवर मध लावल्याने तोंडात खूप लाळ येते. त्यामुळे तोंडातील जखमा लवकर बऱ्या होतात.

तूप
तोंड्याच्या आतील बाजूस तूप लावावे. तसेच तसेच रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून घ्यावे.

दलिया
तोंडात फोड असेल तेव्हा फायबरयुक्त आहार घ्यावा. ओटचे जाडेभरडे पदार्थ खावे.

जास्तीत जास्त पाणी प्या
तोंड येण्याची समस्या ही पोट स्वच्छ होत नसल्याने अधिक प्रमाणात होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून ३ ते ४ वेळा हा उपाय करावा. लवकर आराम मिळतो.

टीप – या घरगुती उपायांनंतरही बरे न वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे