अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा लागतो. बरेचसे लोक सवयीप्रमाणे उठल्यानंतर ब्रश करतात अन् चहा घेतात. परंतु त्याआधी काही खात नाहीत. चहा घेतल्याने फ्रेश वाटते हे खरं आहे परंतु रिकाम्या पोटी चहा घेणे धोक्याचे आहे. त्यामुळे शरीरीचे खूप नुकसान होते.
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने होणारे परिणाम-
– सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा घेतला तर गॅसची समस्या होते. तसेच तुमची पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा घेऊ नका.
– सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतला तर चक्कर येते. चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे चक्कर येते.
– रिकाम्या पोटी चहा घेतला तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही. तसेच भूक लागली तर जास्त जेवण जात नाही. याचाच अर्थ तुमची भूक कमी होते.
– रिकाम्या पोटी चहा घेतला तर तुमच्या पोटात जळजळ होते. त्यामुळे मळमळ, उलट्या, पोटात जळजळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
– शिवाय अॅसिडीटीची समस्या उद्भवते.
– रोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
टीप– लक्षात ठेवा त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पित जाऊ नका. चहा पिण्याआधी काहीतरी खावे. किंवा चहासोबत काहीतरी पदार्थ खावा.