सुंदर चेहरा सर्वांना आवडतो. परंतु हे तारूण्य वयोमानानुसार बदलत जातं. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही तुमची त्वचा नेहमी चांगली आणि तारूण्य अशी ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला मॉर्निंग स्किन केअर रूटीन सुरू करावं लागेल.

त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी करा.

– रोज सकाळी उठल्यानंतर थंड पाणी घ्या. त्या पाण्याने आपले तोंड स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल. शिवाय थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते.

– तसेच तुम्ही टोनरचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. गुलाबपाणी घेऊन चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.

– शरीरासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. तसेच त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेट राहते.

– गुलाबपाणी आणि लिंबापासून सिरम बनवून चेहऱ्यावर लावा. त्यात थोडेसे ग्लिसरीन टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावले तर सर्व घाण निघून जाते.