माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : अनेकांना डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास असतो. अशा वेळी घरातील पुदिन्याचे तेल या आजारांवर अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकते. पुदिन्याच्या तेलाने डोकेदुखी, मायग्रेन बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्वचा, केस यासंबंधित समस्यांवरही पुदिन्याचे तेल अत्यंत गुणकारी ठरते. पुदिन्याच्या तेलाचे काय आहेत फायदे आपण जाणून घेऊयात…
डोकेदुखी- मायग्रेनवर प्रभावी
पुदिन्याचे तेल डोकेदुखी आणि मायग्रेनवर अत्यंत प्रभावी आहे. 2019 साली आरोग्यासंबंधित करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळले की पुदिन्याचे एक थेंब तेल घेत असलेल्या 20% रुग्णांमध्ये डोकेदुखीची तीव्रता कमी झाली आहे. दुसर्या अभ्यासात असे दिसून आले आहे की पुदिन्याचे तेल अशा लोकांना मदत करू शकते, ज्यांना अन्न पाणी गिळण्यास त्रास होतो.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
पचन सुधारते
पुदिन्याच्या तेलामुळे अपचन, पोट फुगणे, पोटदुखीपासून आराम मिळतो आहे. संशोधनात असेही दिसून आले की या तेलामुळे अतिसार आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत मिळते. शिवाय छातीतील जळजळ आणि पित्त कमी करण्यासाठीही हे तेल फायदेशीर ठरते.
मळमळ कमी करते
जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अॅण्ड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जेव्हा तुम्हाला मळमळ वाटत असेल तेव्हा पेपरमिंट ऑइल वास घेतल्यास मळमळ नियंत्रणात येते.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
निरोगी केस आणि त्वचा
पुदिन्याचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. टाळूला रक्त प्रवाह उत्तेजित करण्यास या तेलामुळे मदत मिळते. त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसह, ते कोंडा वर उपचार करण्यासदेखील मदत करते. तसेच या तेलामुळे त्वचेची तीव्र जळजळ सुधारू शकते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)