मानसिक आरोग्य जपणे फार महत्त्वाचे आहे. तसेच आपला आपल्या मनावर ताबा हवा. जेवढं शारिरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे तेवढंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूवर ताबा मिळवायचा असेल आणि मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे.

आज आपण या लेखात ध्यान कसं करावं आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.

ध्यान कसं करावं?
ध्यान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत जागा पाहिजे. ज्यामुळे आपलं लक्ष विचलित होणार आहे. तसेच त्या ठिकाणी मोबाईल नसेल, टिव्हीचा आवाज नसेल शिवाय कोणताही गोंधळ नसेल अशी शांत जागा निवडा आणि ध्यान करा.

– जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा श्वास घेताना आणि श्वास सोडताना त्यावर नीट लक्ष केंद्रित करा. योग करत असताना तुमचे श्वासावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. हे तुम्ही कमीत कमी १५ ते २० मिनिटे करावे.

ध्यान करण्याचे फायदे
– मनात सारखे नकारात्मक विचार येत असतील तर ते दूर करण्यासाठी ध्यान करावं. ध्यान केल्याने नकारात्मक विचार दूर होतात. तसेच सकारात्मक एनर्जी मिळते.

– जीवनात संयम खूप महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं. ध्यान केल्याने संयम वाढतो.

– मन शांत होते.

– एकाग्रता वाढते.

– वर्तमानात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूकता वाढते.

– ताण-तणाव दूर होतो.

– ध्यानामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते परिणामी झोप पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी कमी होतो.

– रागावर नियंत्रण मिळवता येते.

-मानसिक आरोग्य सुधारते

– वेगवेगळ्या स्थितीत शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.