१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. यात अनेक वस्तू, सेवांच्या दरात बदल होतात. केंद्र सरकारने देशाबाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय दुर्मिळ रोग धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी आयात करण्यात आलेल्या औषधांवर आणि विशेष अन्नावरील मूलभूत आयात शुल्क देखील सरकारने रद्द केले आहे. मात्र याचा लाभ वैयक्तिक औषधे आयात करतात अशा लोकांनाच मिळणार आहे.

काळे द्राक्ष खाण्याचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

याशिवाय कर्करोगावर उपचार करणाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या Pembrolizumab (Keytruda) वर देखील सरकारने सूट दिली आहे. मात्र यासाठी रुग्णाला ( वैयक्तिक वापरासाठी ) केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. अशा औषधांसाठी १० टक्के इतके मुलभूत शुल्क आकारले जाते. तसेच जीवनरक्षक औषधे आणि इंजेक्शनवर ५ टक्के कर आकारला जातो. स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी किंवा ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी काही औषधांना सूट देण्यात आलेली आहे.

गंभीर आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांना परदेशातून औषधे आयात करावी लागतात, अशा लोकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.