उचकी व उलटी थांबते

वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण करा. या चूर्णामुळे उचकी व उलटी थांबते.

पोटफुगी

पोटफुगीचा त्रास असेल तर वेलचीचे दाणे हिंगाबरोबर मिसळून खावे.

पचन समस्या

दोन-तीन वेलची, आल्याचा तुकडा, लवंग आणि धने वाटून त्याची पावडर करा आणि ती गरम पाण्यासोबत घ्या.

तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी

तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी वेलची दूर करते. दिवसातून एक वेलची खावी किंवा चहा बनवताना वेलची वापरावी.

ॲसिडिटी

ॲसिडिटी झाल्यावर वेलची चावून चावून खा किंवा चघळून खा.

पुरुषांच्या लैंगिक समस्या

तुपाबरोबर नियमितपणे वेलची चूर्ण घेतल्याने पुरुषांचा लैंगिक दुबळेपणा कमी होतो. तसेच शुक्रधातूचे कार्य सुधारते. वारंवार स्वप्नदोष होणाऱ्यांनीही तुपाबरोबर नियमितपणे वेलची चूर्ण घ्यावे.

भूकवाढ

दररोज एक वेलची खाल्ल्याने भूक वाढते.