हिवाळ्यात तीळ खाणे फायदेशीर
हिवाळ्यात तीळ खाणे फायदेशीर मानले जाते. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात.

कोरड्या त्वचेसाठी लाभदायक
अनेकांची त्वचा कोरडी असते, अशा व्यक्तींनी आहारात तीळाचा समावेश करावा.

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त
तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

केसांसाठी लाभदायक
नियमित तीळ किंवा तिळाचे पदार्थ खाल्ल्याने, तिळाचे तेल केसांना लावल्याने केसगळती कमी होते.

स्त्रीयांसाठी लाभदायक
मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो, त्यांनी तिळाची चटणी खावी.

दात बळकट बनतात
तिळामध्ये कॅल्शिअम हा घटक असतो. दातांच्या बळकटीसाठी तिळाचा उपयोग होतो.

मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते
दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास आपण आपल्याला असणाऱ्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकतो.

चेहऱ्यासाठी उपयुक्त
चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल तर दुधात तीळ भिजवून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावावी. तिळाच्या तेलाने मालीश केल्याने त्वचा मऊ होते.

हाडे मजबूत बनतात
हाडांच्या पोषणासाठी व बळकटीसाठी तीळ खाणे अतिशय उपयुक्त आहे. तिळामध्ये हाडांचा ठिसूळपणा कमी करणारा झिंक घटक असतो.

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय