गणपतीला रोज वेगवेगळा प्रसाद बनविण्यासाठी वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. पौष्टिक असणाऱ्या मखाना पासूनही मोदक बनवता येतो. एक वेगळा मोदकांचा प्रकार म्हणून ही सोपी रेसिपी नक्की करून पहा. जाणून घ्या मखाना पासूनही मोदक बनविण्याची रेसिपी –

साहित्य

१ कप मखाना
२ चमचे खवलेला नारळ
२-३ पिस्ता
अर्धा लीटर फुल क्रीम दूध
३/४ कप साखर
२-३ छोटी वेलची
१ चमचा तूप
५-६ बदाम
५-६ काजू

कृती

मखाना मोदक बनवण्याकरता पॅनमध्ये मंद आचेवर मखाने हलकं भाजून घ्या. मखान्याचा रंग बदलल्यावर मखाने एका वाटीत काढून घ्या. नंतर भाजलेले मखाने मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.
आता एका पॅनमध्ये १ चमचा तूप टाकून यात बदाम आणि काजूचे तुकडे भाजून घ्यावेत.
त्यानंतर नारळाचा किस, पिस्ता भाजून घ्यावे
एका भांड्यात दूध उकळावे.
15- 20 मिनिटानंतर दूधात साखर मिसळावी आणि दूध निम्मे आटवाव.
त्यानंतर मखान्याची पावडर आणि सुकामेवा, वेलची पावडर दूधात टाकावेत आणि हे मिश्रण जाडसर मळून घ्यावे.
आता मोदकाच्या साच्याला तूप लावून मोदक तयार करावे.
अशा प्रकारे बनवलेले पौष्टिक मोदक चवीसोबतच आरोग्यासाठीही चांगले आहेत.