केसांच्या सौंदर्यात भर घालणारा गुलाब त्वचेच्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे. जाणून घ्या चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून फेसपॅक कसा तयार करावा –

कोरफड व गुलाबपासून बनवलेला फेसपॅक
गुलाब पाकळ्यांमध्ये थोडे गुलाबजल कोरफड जेल घाला. हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे ओपन पोअर्सची समस्या कमी होते.

दही आणि गुलाबपासून बनवलेला फेसपॅक
गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून त्यात एक चमचा दही मिक्स करून चेहऱ्याला लावावे. फेसपॅक वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते.तसेच गुलाब पाकळ्यांमुळे त्वचा मुलायम बनते.

गुलाब आणि चंदन फेसपॅक
गुलाब पाकळ्यांची वाटून पेस्ट बनवा. त्यामध्ये थोडं कच्च दूध आणि चंदनाची पावडर घालून मिश्रण नीट मिक्स करा. तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. गुलाब आणि चंदनमुळे त्वचेला थंडावा मिळतो तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.