उच्च रक्तदाब नियंत्रित ( high blood pressure) करणे आजकाल गरजेचे आहे कारण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. योग्य आहार हा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात काही सोपे बदल करूनही रक्तदाब नियंत्रित करू शकता. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ फायदेशीर आणि कोणते टाळावेत. (diet for Control high blood pressure)
धान्यांचा समावेश
बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा आहारात नियमित समावेश करा.
ताज्या फळांचा समावेश
मोसंबी, द्राक्ष, संत्र, जाम, अननस यासारखी फळे आहारात घ्या.
मीठ कमी करा
जेवणावरून मीठ टाकण्याची सवय टाळा, तसेच जास्त मिठाचे पदार्थ (कुरकुरे, चिप्स, हॉटेलचे पदार्थ) खाणे कमी करा.
कॅफिनचे सेवन मर्यादित करा
चहा आणि कॉफी कमी प्रमाणात घ्या.
योग्य तेलाचा वापर
स्वयंपाकासाठी सोयाबीन तेलासारखे आरोग्यदायी तेल वापरा.तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा
तळलेले, मसालेदार आणि जास्त तेलातले पदार्थ कमी करा.
साखर आणि जंक फूडपासून दूर रहा
रिफाइंड पदार्थ, मिठाई, बिस्किटे, पेस्ट्री, जंक फूड कमी करा.