आजकाल हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढली आहे. मात्र या समस्येने घाबरून जाण्याचे कारण नाही. आहारावर नियंत्रण ठेवले तर हाय ब्लड प्रेशर नक्कीच नियंत्रणात राहतो. जाणून घ्या हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत –

 

सोयाबीन तेल वापरावे
जेवण बनविण्यासाठी सोयाबीन तेल वापरावे.

मीठ कमी प्रमाणात खावे
मिठाचे अधिक सेवन करणे टाळावे. जेवणावरून मीठ टाकण्याची सवय मोडा. खूप काळ साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये तयार केलेले पदार्थ, कुरकुरे, चिप्स इत्यादी मिठाचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळावे.

आहारातील पदार्थ
बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा
हाय ब्लड प्रेशर असणारांनी तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

गोड पदार्थ, फास्टफूड टाळा
साखर, रिफाइंड खाद्यपदार्थ, जंक फूड यापासून दूर राहा.

फळे
मोसंबी, द्राक्ष, संत्र, जाम, अननस या फळांचे सेवन करा.

चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करा
हाय ब्लड प्रेशर असणारांनी चहा आणि कॉफी घेणे कमी करा.