पॅकेट मधील हळद खरेदी करत असाल तर त्यावर FSSAI मार्क आहे का हे तपासून पहा. आणि सुट्टी हळद घेणार असलं तर खालील पद्धतीने हळदीची भेसळ ओळखा.
हळदीमध्ये कृत्रिम रंग घातल्यामुळे गडद पिवळा रंग दिसतो. हळदीच्या रंगावरून हळद शुद्ध आहे की भेसळयुक्त ओळखू येते.
हळदीचा रंग हा पिवळा असला तरी हळद शुद्ध असल्यास ती कालांतराने फिकी पडते. तिचा गडदपणा कमी होतो. जर हळदीमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला असेल तर अशी हळद ही पिवळी धम्मक दिसत राहते.
अर्धा कप पाण्यात हळद आणि हायड्रो क्लोरिक ऍसिड टाकावे. मिश्रणाला लाल रंग येईल आणि काही वेळाने नाहीसा होईल. जर मिश्रण लालच दिसत असेल तर हळदीत भेसळ आहे समजावे.
एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद पावडर मिसळा. जर हळद शुद्ध असेल तर पाण्यात तळाशी जावून बसेल आणि पाणी पिवळसर रंगाचे होईल. जर हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग काळसर पिवळा होईल