रक्तदानाच्या उदात्त हेतूबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी, रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी, वैद्यकीय क्षेत्रातील रक्तदानाच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस ( World Blood Donor Day) साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याचे यंदाचे विसावे वर्ष आहे. जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे.
२०२४ ची थीम
दानाची 20 वर्षे साजरी करणे: रक्तदात्यांचे आभार!” ही या वर्षीची थीम आहे. या थीमद्वारे, लाखो रक्तदात्यांचे आभार मानले जात आहेत.
रक्त वाढीसाठी घरगुती उपाय
एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. अॅनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.
थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
सफरचंद आणि बीट यांचा आहारात समावेश करावा.
सफरचंदाचा ज्यूस नियमित पणे प्यावा, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये शक्य असल्यास एखादा चमचा मधही टाकू शकता.
बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असेत. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.