बदाम हे पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले सुकामेवे आहेत, परंतु काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन टाळणे आवश्यक आहे. अन्यथा, ते आरोग्यास हानीकारक ठरू शकते.
या’ व्यक्तींनी बदाम खाणे टाळावे, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
पचनासंबंधित समस्या असल्यास (If you have digestive issues)
बदामातील जास्त फायबर्स पचनाच्या तक्रारी वाढवू शकतात.
पचनासंबंधित काही समस्या असल्यास बदाम खाऊ नका. सगळेच फायबर्स आपले शरीर पचवू शकत नाही.
स्थूलतेची समस्या (Obesity issues)
बदामामध्ये चरबी आणि कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे स्थूलतेची समस्या असलेल्यांनी बदाम खाणे टाळावेत. .
मुतखडा किंवा पित्ताशयाचे आजार (Kidney stones or gallbladder issues)
बदामातील ऑक्सलेट्स कॅल्शियम शोषणास अडथळा आणून स्टोनची समस्या वाढवतात.
मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असल्यास किंवा पित्ताशया संबंधित काही त्रास असल्यास बदामाचे सेवन करणे टाळा. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. किडनी स्टोनचा त्रास हा मूत्राशयात कॅल्शियमचे खडे झाल्यामुळे होतो. बदाम शरीरास कॅल्शियम शोषून घेण्यास मज्जाव करतात.
उच्च रक्तदाब (High blood pressure)
बदामातील काही घटक उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी प्रतिकूल ठरू शकतात.