कोरोना नंतर आता H3N2 एन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) व्हायरसची चर्चा सुरु झाली आहे.  देशभरात या फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यात फ्लूचे रुग्ण तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय –

लक्षणे
१. खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे
२. घशात खवखव
३. ताप
४. डोकेदुखी
५. अंगदुखी
६. थंडी वाजणे
७. थकवा

संसर्ग होण्याची माध्यमे –
फ्लूची बाधा झालेली व्यक्ती शिंकली की त्याचे ड्रॉपलेट हवेत पसरतात
दुसरी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो
H3N2 हा संक्रमित होणारा व्हायरस आहे. गर्दीच्या ठिकाणी हा व्हायरस लवकर पसरतो.
एका व्यक्तीच्या शरीरातून तो दुस-या व्यक्तीच्या शरीरात पसरतो.

H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसं कराल?
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
गर्दीत मास्क घाला.
स्वत: अँटीबायोटिक घेणं टाळा. डॉक्टरांनी अँटीबायोटिक दिल्यास सांगितल्याप्रमाणेच त्याचं सेवन करा
हात नियमितपणे स्वच्छ धुवा.
विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.

टीप – जर अधिकच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी अँटीव्हायरल औषध लिहून दिलं, तर त्याचं सेवन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या मानाने कोणतीही अँटीबायोटिक घेणं टाळा.