सध्याच्या जीवनात अनेकांना बसून काम करावं लागत आहे. यामुळे शरीराच्या अनेक समस्या जाणवतात. यात गुडघेदुखी, लठ्ठपणा तसेच कंबरदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे लोक पुन्हा व्यायामाकडे वळतात. मग कोणता व्यायाम करावा हे लोकांना समजत नाही.

जर कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल तर उत्कटासन हे आसन खूपच फायदेशीर आहे. हे आसन सोपेही आहे. ते कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उत्कटासन करण्याची कृती –

सुरूवातीला सरळ उभे राहा. नंतर दोन्ही पायांत थोडे अंतर ठेवा. आणि सरळ ताठ उभे रहा.
आता दोन्ही हात समोच्या दिशेने घ्या.
आता दिर्घ श्वास घ्या. मग श्वास हळूवार सोडत दोन्ही गुडघ्यातून खाली वाका. आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसत आहोत, त्याप्रमाणे शरीराची अवस्था ठेवा.
जवळपास ५ ते ६ सेकंद या अवस्थेत रहा आणि त्यानंतर पुन्हा मुळ स्थितीत या.
५ ते ६ वेळा हा व्यायाम करावा.

उत्कटासन करण्याचे फायदे
हे आसन केल्याने पाय, कंबरीचे स्नायू मजबूत होतात.
या आसनामुळे मनावरचा ताण कमी होतो.
हे आसन जर तुम्ही दररोज केलं तर एकाग्रता वाढते.
हे आसन केल्याने तुम्हाला कधीच गुडघ्याचा त्रास जाणवणार नाही.