किचनमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे झुरळांचा वावर (Cockroaches). खादयपदार्थांच्या ओढीने आणि पाण्याच्या शोधार्थ झुरळे एकदा किचनमध्ये शिरली की त्यांच्यापासून मुक्तता मिळवता मिळवता नाकीनऊ येते. कारण ह्या झुरळांचा पुनरुत्पादनाचा वेळ प्रचंड असतो आणि ही झुरळ कीटकनाशकांना पण दाद देत नाहीत. झुरळ जीवजंतू आणि बॅक्टेरिया घेउन फिरत असतात त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. शिवाय झुरळ वस्तूंनाही हानी पोहचवतात. झुरळांमुळे किचनमध्ये उग्र वास येत राहतो. अशा या उपद्रवी झुरळांपासून मुक्तता मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पहा –

स्वच्छता राखा (Keep clean)
सर्वात महत्वाचे म्हणजे उपचार करण्यापूर्वी वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे किचनमध्ये स्वच्छता नेहमी स्वच्छता राखावी. रात्री किचनमध्ये खरकटे राहू देऊ नका. घरात पाण्याचा निचरा होणार नाही याची काळजी घ्या.

तमालपत्राची पानं (Bay leaf)
घरातील ज्या भागामध्ये झुरळांचा वावर जास्त आहे. त्या ठिकाणच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्राची पानं चुरगळून ठेवावीत किंवा एका कपड्यामध्ये बांधून ठेवा.

बोरिक पावडर (Boric powder)
बोरिक पावडर दुधात भिजवून त्याचे छोटे गोळे करावेत आणि किचनमधील अस्वच्छ जागी, कोपऱ्यांमध्ये ठेवावेत.
बोरिक पावडर आणि साखरेचे मिश्रण बनवून किचनमधील कोपऱ्यांमध्ये ठेवावे.

लवंग (Clove)
झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावीत. लवंगेच्या उग्र वासाने झुरळ किचनमध्ये थांबत नाहीत.

कडुनिंब (Neem)
कडुनिंबाचे तेल, कडुनिंबाची पावडर झुरळांवर प्रभावशाली आहे. झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी कडुनिंबाची पावडर टाका.
कडुनिंबाच्या तेल स्प्रे बॉटलमध्ये भरून झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी शिंपडा.

पुदीना (Peppermint)
किचनमधील कोपऱ्यांमध्ये पुदिन्याची पाने नियमितपणे टाकावीत. 2 ते 3 दिवसानंतर ही पानं बदलत राहा.
पुदीन्याच्या तेलामुळेही झुरळे पळून जातात. पुदिन्याचे तेल स्प्रे बॉटलमध्ये भरून झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी शिंपडा.
पुदीन्याची पाने पाण्यात वळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलने स्वयंपाकघरातल्या अस्वच्छ जागी, कोपऱ्यांमध्ये शिंपडा.

लसूणची पेस्ट (Garlic paste)
लसूण, कांदे आणि काळीमिरीची पेस्ट बनवून पाण्यात मिसळा आणि किचनमध्ये किंवा झुरळांवर स्प्रे करा.

टीप – एकदा उपाय केल्याने झुरळे लगेच कमी होत नाहीत. त्यासाठी नियमितपणे न कंटाळा करता उपाय करणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लहान मुले असताना झुरळांपासून मुक्ती मिळवण्याचे घरगुती उपाय काळजीपूर्वक करावे.