कीटो डायट जास्त कालावधीसाठी फाॅलो करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. कारण किटो डायट फाॅलो केल्यामुळे दर दिवसाला ५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी कार्ब्सचे शरीराला मिळतात. जाणून घ्या कीटो डायटमुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात –
हृदयाच्या आरोग्यसाठी घातक
कीटो डायट फाॅलो केल्यामुळे नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.
मसल्स देखील बर्न होतात
कीटो डायट फाॅलो केल्यामुळे वजन कमी केल्यामुळे फॅट बर्न होण्यासोबतच मसल्स मास देखील बर्न होत जाते.
पुन्हा वजन अधिक वाढण्याचा धोका
कीटो डायट सोडून नॉर्मल डायट सुरु केल्यामुळे तेव्हा आधीच्या वजनाच्या तुलनेमध्ये अधिक वाढण्याचा धोका निर्माण होतो.
सतत तहान लागते
कीटो डायटमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन करत नाही. त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचे उत्पादन होत नाही. त्याचा परिणाम इलेक्ट्रोलाइट लेवलवर परिणाम होतो आणि किडनीमध्ये पाणी आणि मीठ बाहेर पडायला सुरुवात होते. पुढे सतत मूत्र विसर्जन करायची इच्छा होते. तसेच सतत तहान लागते.
पचनसंस्थेवर परिणाम
किटो डाएटमुळे काही जणांना जुलाब अथवा डायरियाचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, अशक्तपणा येणे
डाएटमुळे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर मोठा ताण पडतो ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि ताप येण्याची शक्यता असते.
हार्मोन सायकल बिघडते
हार्मोन सायकल विस्कळीत होण्याची शक्यता असते.
बीपी आणि शुगर लेव्हल बिघडते
किटो डाएटमुळे तुमचं बीपी आणि शुगर लेव्हलही वरखाली होते.
टीप – कोणताही डाएट प्लान स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे