निरोगी हृदय म्हणजे निरोगी आयुष्य! आपल्या दैनंदिन आहारात काही घरगुती पदार्थांचा समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. लसूण, बदाम, अक्रोड, अवोकाडो, ब्रोकोली, गाजर यांसारखे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात किंवा बाजारात सहज उपलब्ध होतात आणि हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ हृदयाला कसे निरोगी ठेवतात.
हृदयासाठी उपयुक्त घरगुती पदार्थ
लसूण (Garlic)
लसूण शरीरासाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे, जो अनेक रोगांना बरा करतो. त्यातील औषधी गुण जसे की अँटी ऑक्सिडेंट, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शिअम, सेलेनियम, माग्नीज आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्यास मज्जाव करतात. त्यामुळे हृदयात आणि नसांमध्ये रक्ताच्या गाठी होत नाहीत.
बदाम (Almonds)
बदाममध्ये न्यूट्रिएंट्सचे प्रमाज भरपूर असते. हे व्हिटॅमिन आणि खजिनांचे भांडार आहे, जे हृदयाला तंदुरुस्त ठेवतात. बदाममध्ये दोन आवश्यक घटक आहेत, ज्यामुळे हृदयविकार कमी होतात. बदाम खाल्याने कोलेस्ट्रॉल पातळीही नियंत्रणात राहते.
अक्रोड (Walnuts)
अक्रोडमध्ये ओमेगा 3 एस या शरीराला गुणकारक असलेल्या फॅटचे प्रमाण भरपूर असते. दिवसभरात 3-4 अक्रोड खाल्यास आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदय आणि नसांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या गाठी होऊ देत नाही.
अवोकाडो (Avocado)
अवोकडोचे सेवन आपण जवळपास करताच नाही; परंतु हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मोनो सॅच्युरिटेड फॅट यात मोठ्या प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासह हृदयविकाराचा धोका कमी करतात. यात पोटॅशियमदेखील असते, जे हृदयाला आवश्यक पोषक तत्व पुरवतात.
ब्रोकोली आणि गाजर (Broccoli & Carrots)
ब्रोकोलीसह कोबी, ब्रसेल्स स्प्राउट, फ्लॉवर या भाज्या देखील हृदयाच्या स्वास्थासाठी आवश्यक असतात. या भाज्यांमध्ये मोठया प्रमाणात फायबर, पोटॅशियम, अँटी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे हृदयरोग नियंत्रणात राहतात. तसेच गाजरातदेखील भरपूर अँटी ऑक्सिडेंटची मात्रा असते. तसेच यातील पोटॅशियम ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवतात.