भारतीय हवाई दलात अग्निवीर एअर रिक्रूटमेंट अंतर्गत तरुणांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण पदांची संख्या 3500 आहे.

मुदत
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे तर, 17 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

शुल्क
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

पात्रता
अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असले पाहिजेत.
27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान जन्मलेल्या उमेदवारांनाच भारतीय हवाई दल अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज करता येईल. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट देण्याची तरतूद आहे.

प्रोसेस
अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवरील भरती लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
अर्ज भरून फी भरा.
शेवटी, फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.