माझं आरोग्य टीम ः गूळ (jaggery) आपल्या शरीरासाठी अत्यंत औषधी पदार्थ मानला जातो. डॉक्टर देखील साखरेऐवजी गुळाचे सेवन करण्याच्या किंवा गुळाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. मूळात गुळामुळे वजन नियंत्रणात राहत असल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. कदाचित काही लोकांना थेट गूळ खाणे आवडणार नाही. मात्र ते गुळाची पोळी बनवून ती खाऊ शकतात. ज्यामुळे गुळही खाणे होऊन आणि पोट भरण्यासही मदत होईल. काय आहेत गूळ खाण्याचे फायदे आणि कशी बनवली जाते गुळाची पोळी हे आपण पाहूयात…(Jaggery’s delicious roti is beneficial for boosting immunity)
गूळ खाण्याचे फायदे
1. रक्तदाब नियंत्रणात राहतो
– गुळाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. गुळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील अॅसिड कमी होण्यास मदत होते..
2. जीवनसत्त्वांचे मोठे प्रमाण
निरोगी राहायचे असेल तर रोज गूळ खाण्याच्या सल्ला तज्ज्ञ देतात. गुळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6 ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय गुळामध्ये फॅटचे प्रमाणही नगण्यच असते. त्यामुळे वजनही वाढत नाही.
3. यकृत निरोगी राहण्यास मदत
गुळातील औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.
4. सांधेदुखीपासूनही आराम
सकाळी गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीमुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. गूळ खाल्ल्याने हाडांची रचना सुधारून हाडेही मजबूत होतात.
5. मासिक पाळीतील त्रास कमी होण्यास मदत
मासिक पाळीदरम्यान गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. शिवाय शरीरास आवश्यक पोषक घटक गुळामध्ये आढळतात.
अशी तयार करा स्वादिष्ट गुळाची पोळी
– प्रथम तीळ कढईत सोनेरी होऊ पर्यंत तळा
– तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
– एका कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून गरम करा
– त्यात बेसन मंद आचेवर तळून घ्या
– त्यानंतर त्यात गुळाचे बारीक तुकडे टाका
– त्यानंतर एका खोल भांड्यात बेसन, तीळ, आणि किसलेला गूळ भाजून ठेवा
– एका भांड्यात मैदा घेऊन त्यात थोडे पाणी, गरजेनुसार मीठ घालून एकत्र करा
– या मिश्रणाचे पीठ मळून गोळे करा
– त्यानंतर पीठाचे गोळे हलक्या हातांनी लाटून ते तव्यावर तुपात भाजून घ्या.
– गुळाची स्वादिष्ट पोळी तयार
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)