कामाच्या गडबडीत महिलांना बऱ्यापैकी लक्ष द्यायला जमत नाही. असे असले तरी प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे. महिलांनो, जाणून घ्या सदृढ आरोग्यासाठी टिप्स

मन प्रसन्न ठेवा
मन प्रसन्न ठेवल्याने सकारात्मक विचार वाढीस लागतात. चिडचिड कमी होते, कार्यक्षमता वाढते.

टेंशन कमी घ्या
महिलांना कामे खूप असतात म्हणून ती वेळेत पूर्ण व्हावीत याच प्रेशर महिलांवर असत त्यामुळं त्यांना आपोआपचं टेंशन येत. ऑफिसकाम आणि घरकाम यांचं योग्य व्यवस्थापन करा. तसेच घरातील माणसांचीही कामात मदत घेण्यास शिका. स्वत:लाही वेळ द्यावा. तसेच मेडिटेशन, योगासने करावीत. आवडते छंद जोपासावेत.

पाणी अधिक प्रमाणात प्या
आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जेवढे शक्य होईत तेवढे पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व अवयव कामं चांगल्या पद्धतीने करतात. तसेच पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते.

पौष्टिक पदार्थ खा
महिलांनी आपल्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. उगाच घरात उरलेले शिळं अन्न संपवायची स्वतःची जबाबदारी समजून नका.

वॉकिंग करा
शरीर फिट आणि सदृढ ठेवण्यासाठी रोज 20-30 मिनिटं वॉकिंग करा . त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.

झोप
महिलांना अनेक कामामुळं, जबाबदाऱ्यांमुळं पुरेशी झोप मिळत नाही. परंतु चांगली झोप न झाल्याने आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. त्यामुळे 7-8 तास झोप घेणे गरजेचे आहे.

जागतिक महिला दिन : मासिक पाळीवेळी ‘तिला’ हवीये तुमच्या थोड्याशा ‘आधारा’ची गरज

उसाच्या रसाचे ‘हे’ पाच आश्चर्यकारक फायदे उन्हाळ्यात तुमचा थकवा करतील दूर!