जगभरातील लोक चहा आणि कॉफीचे मोठे चाहते आहेत. प्रत्येकाची दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. यात असलेले कॅफीन तुमच्या डोक्याला चालना देण्यास मदत करतात, मात्र त्याचे जास्त सेवा तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकते. यामुळे अनेकांना झोप न येणे, पोटाच्या समस्या जाणवतात. चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते पर्याय आहेत ज्यामुळे कॅफिनच्या सेवनाशिवाय आपण ॲक्टिव्ह राहू शकतो.

  1. व्यायाम :
    व्यायामुळे शरीरात रक्ताचे फ्लो वाढतो. यामुळे ऊर्जाही वाढते. रोज सकाळी उठून चालणे, धावणे यामुळे तुमच्या डोक्याला चालना मिळते.
  2. भरपूर पाणी पिणे :
    अनेक जण कमी पाणी पितात. शरीरात पाण्याचे प्रमाम कमी असल्याने थकवा जाणवतो, ज्यामुळे डोकं सुन्न पडून झोप येते. त्यामुळे दिवसभरात आपण कमीत कमी 2-3 लीटर पाणी प्यावे. भरपूर पाणी पिल्याने डिहायड्रेशनची समस्याही जाणवत नाही. कारण डिहायट्रेशनच तुम्हाला कॅफिन असलेले पेय पिण्यास भाग पाडात असतात.
  3. अति प्रमाणातील जेवण टाळणे :
    एकदाच जास्त जेवन केल्याने झोप लागते. त्यामुळे जेवताना अति जेऊ नये. मर्यादेत पोट भरेल इतकेच जेवावे. त्यामुळे तुमची ऊर्जाही कायम राहते. जास्त जेवल्याने सुस्ती चढते आणि ऊर्जा घटते. स्नॅक्स खाताना हेल्दी फूडच खावे. उदाहरणार्थ: शेंगदाणे, मोसबी, दही, इतर फळे.
  4. शक्य झाल्यास दुपारी झोप :
    दुपारच्या जेवणानंतर ऊर्जा कमी होत असते. त्यामुळे आपण अनेकदा चहा, कॉफीचे सेवन करतो, परंतु, यापुढे ही चूक करणे टाळल्यास त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल. दुपारी झोप आल्यास शक्य झाल्यास काही मिनिटे झोप काढावी, त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि आळस न करता तुम्ही तुमच्या कामे वेगाने करालं.
  5. रात्रीची पूर्ण झोप आवश्यक :
    तुमच्या चांगल्या जीवनामानासाठी तुम्ही रात्री चांगली झोप घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते 7-8 तास रोज झोप घेणे आवश्यक आहे. कॅफिनच्या जास्त सेवनामुळे झोपेचे चक्र कोलमडू शकते, त्यामुळे कॅफिनचे सेवन कमी ठेवून रात्री भरपूर झोप घ्यावी.
  6. तणाव व्यवस्थापन :
    आजच्या धकाधकीच्या दिवसात जीवनात तणाव वाढला असून ही चिंतेची बाब झाली आहे. त्यामुळे झोप नीट न येता जीवनक्रमही बदलतो. हा तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा आणि तुमच्या आवडीची कामे करत राहिली पाहिजे. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहून कॅफिनयुक्त पेयांचे सेवन टाळालं.