दरवर्षी जगभरामध्ये 16 ऑक्टोबर रोजी जागतिक आहार / अन्न दिवस पाळला जातो.
जागतिक आहार दिन साजरा करण्यामागचा उद्देश
उपासमार , भूकबळी रोखणे. तसेच जगभरात अन्नसुरक्षा राखण्यासाठी, विशेषतः दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात अन्नाचा तुटवडा भासू नये यासाठी जागरुकता निर्माण करणे. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी तसेच कोणीही भुकेलेला राहू नये यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 2030 पर्यंत जगात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ‘झीरो हंगर’ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2020 ची थीम
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “Grow, nourish, sustain. Together. Our actions are our future या थीमसह जगभरात हा दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक आहार दिनाविषयी माहिती
जागतिक आहार दिवसाची संकल्पना प्रथम 1945 मध्ये खाद्य आणि कृषी संस्थेने (FAO – Food and Agricultural Organisation) मांडली. खाद्य आणि कृषी संस्थेच्या सभासद देशांनी 1979 पासून जागतिक आहार दिन पाळायला सुरुवात केली. तेव्हापासून जागतिक आहार दिन पाळला जातो आणि या निमित्ताने जगभरातील उपासमार, गरिबीमागची कारणे, त्यावरील उपाय याबाबत जागरुकता पसरवली जात आहे.
अन्न आणि कृषी संघटनेविषयी माहिती
खाद्य आणि कृषी संस्था (FAO – Food and Agricultural Organisation) ही एक संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था असून तिची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. या संघटनेचे मुख्यालय इटलीमधील रोम येथे आहे. ‘Let there be bread’ हे या संस्थेचे घोषवाक्य असून जगातील 194
देश या संस्थेचे सदस्य आहेत. आजही अनेक देशात भूकबळी आढळतात. अनेक लोकांचे मृत्यू पोषणाच्या अभावी होत आहेत. ही संघटना जगातील उपासमार कमी कशी करता येईल या गोष्टीकडे लक्ष देते. त्या संदर्भात काम करणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देते.