चीनमध्ये HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतातही देखील एचएमपीव्हीची प्रकरणे समोर येत आहेत. जाणून घ्या HMPV व्हायरसबद्दल महत्वाची माहिती –
HMPV म्हणजे काय?
HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) हा एक श्वसन संसर्गजन्य आजार असून, तो श्वसन मार्ग प्रभावित करतो. हा प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो.
HMPV विषाणूची लक्षणे
HMPV विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणे, अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसतात. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उपाय
जेव्हा खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्यावी.
HMPV होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा खोकला झालेल्या व्यक्तीपासून अंतर राखा.
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
सर्दी-खोकला झाल्यास बाहेर जाताना मास्क लावा.
हात साबणाने स्वच्छ धुवा.
सर्दी-पडसे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.