बालदमा म्हणजे काय

लहान मुलांच्या श्वासनलिकेला तात्पुरती सूज येते व श्वास घ्यायला त्रास होतो तसेच धाप लागते यालाच बालदमा म्हणतात.
लहान वयात कफाला वाताची जोड मिळाली तर त्यातूनही बालदमा होऊ शकतो.
कोणतेही काम करताना लहान मुलाला अधून मधून धाप लागणे , सारखा खोकला येणे , श्वास घेताना आणि बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला बालदमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते.

बालदमा होण्याची कारणे

*कफ आणि वात
*अनुवंशिकता
*आई- वडिलांपैकी एकाला खोकला किंवा दम्याचा त्रास असणे किंवा त्यांच्यात कफ-वातदोषाचे असंतुलन असणे.
श्वसनाशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या संसर्गामुळे
वातावरणातील ॲलर्जीक घटकामुळे (उदा. धूळ धूर , थंड पदार्थ – आईसक्रीम , शीतपेय , कुत्रा-मांजराचे केस, *फुलांचे पराग कण , मॉर्टिन/ कासव छाप क्वाईलचे धूर, थंड हवा)
*सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहणे (एसी, कूलर)
*श्वसनसंस्थेची ताकद कमी असणे
*ताप, सर्दी, फ्लू, ब्रॉन्कायटिस, घशाला सूज येणे यांसारखे आजारही बालदम्याला कारणीभूत ठरू शकतात.