माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : आयुर्वेदात हळद, मेथी आणि सुंठीला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. हळद, मेथी, सुंठ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी समजल्या जातात. सध्या सर्वत्र ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने हे आजार पटकन होत आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी हळद, मेथी, सुंठ अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे तुमच्या घरात तुम्ही सुंठाचे लाडू तयार करू ठेऊ शकतात. सुंठाच्या लाडूमध्ये पीठ, सुंठ, हळद, मेथी, ड्रायफ्रुटस असे गुणकारी पदार्थ असतात. हे तीनही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहेत हे आपण पाहूयात…(Increase Immunity By Turmeric Dry Ginger)
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
हळद
हळदीमध्ये व्हिटामिन बी 6, झिंक, कॉपर, फॉस्फरस असते. शिवाय हळदीत अँटीऑक्सिडन्ट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटकही असतात.
मेथी
मेथीच्या दाण्यांत व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन के आढळते. शिवाय यातील कॅल्शियम, आयर्न, प्रोटिन, फायबर, पोटॅशियम आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहेत.
सुंठ
सुंठामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन बी6, व्हिटामिन बी12, लिपिड अॅसिडसारखे पोषक घटक असतात. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, थायमिन, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस असे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
खोकल्यावर उपाय
हळद, मेथी आणि सुंठीचे मिश्रण व्हिटामिन सी, झिंकने भरपूर असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर विषाणूंशी लढण्यास सक्षम होते. याच्या सेवनामुळे खोकलाही दूर होतो.
वात-कफ होईल दूर
हळद, मेथी आणि सुंठाचे सेवन केल्याने वात आणि कफ दूर होतो. आयुर्वेदानुसार, जेव्हा शरीरात वात वाढतो, तेव्हा अनेक आजार होतात. हळद, मेथी आणि सुंठामुळे वात आणि कफ संतुलित राहतो.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)