गरुडासन, वृक्षासन आणि ताडासन या योगासनांच्या नियमित सरावाने एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. एकाग्र मन झाल्यामुळे स्मरणशक्ती, बुद्धी तर वाढतेच शिवाय मनःशांती ही लाभते. जाणून घ्या एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने करण्याची योग्य पद्धती

गरुडासन
गरुडासन करताना प्रथम सरळ उभे राहा. नंतर उजवा गुडघा खाली वाकवा. आता डावा पाय उजव्या पायाभोवती गुंडाळण्याचा प्रयत्न करा. पायांच्या टाचा एकमेकांवर येतील हे ध्यानात घ्या. डाव्या पायाचा उजव्या नडगीच्या तळाला स्पर्श झाला पाहिजे. दोन्ही हात खांद्यापर्यंत वाढवा. उजवा हात डावीकडे गुंडाळा. आता खाली बसत जा. गुडघे शरीराच्या मधोमध आले पाहिजेत. 30 सेकंद तसेच थांबा. नॉर्मल श्वासोच्छवास चालू ठेवा.
टीप – हे आसन सकाळी रिकाम्या पोटी करावे.

वृक्षासन
वृक्षासन करताना सुरूवातीला सरळ उभे राहा. दोन्ह हात जोडा. मग उजवा गुडघा वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. लक्षात ठेवा डावा पाय घट्ट ठेवायचा आहे. मग श्वास घ्या आणि सोडा. आता दोन्ही हात वर घेऊन ‘नमस्कार’ करा. त्यानंतर उजवा पाय जमिनीवर ठेवा. आता हीच प्रक्रिया डाव्या पायाने पुन्हा करा.

ताडासन
ताडासन करताना सरळ उभे राहा. पायांत अंतर ठेवा. दोन्ही हात शरीरापासून दूर ठेवा. त्यानंतर आता टाचांवर उभे राहा. मग खांदे, हात आणि छाती वरच्या बाजूस ताणून घ्या. आपल्या संपूर्ण शरीराचा दाब हा टाचांवर राहिल ही काळजी घ्या. काही वेळ असेच उभे राहा.

केस गळती टाळण्यासाठी घरगुती उपाय

छातीत जळजळ होत असेल तर ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; मिळेल तात्काळ अराम