पौष्टिक घटक, व्हिटॅमिन्स हे मानसिक आरोग्याच्या (mental health) चांगल्या स्थितीसाठी गरजेचे असतात. त्यांचं पुरेशा प्रमाणात सेवन केलं तर मानसिक स्थिती चांगली राहू शकते. जाणून घ्या मानसिक आरोग्यासाठी शरीराला कोणते व्हिटॅमिन्स आणि घटक आवश्यक असतात याविषयी माहिती –
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (Vitamin B-Complex)
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स मूड नियंत्रित करण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यास आणि मेंदूच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. जीवनसत्त्वांच्या या गटामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 यांचा समावेश होतो. हे जीवनसत्त्वे चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्सयुक्त पदार्थ
होल व्हीट, ब्राऊन राईस, नाचणी, पालेभाज्या, अंडी, चिकन-मटण, डेअरी प्रोडक्ट इत्यादीमध्ये हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् (Omega-3 Fatty Acids)
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्मेंदूतील इनफ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्य आणि चिंतेची लक्षणे कमी होतात.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् युक्त पदार्थ
फॅटी फिश, फ्लॅक्ससीड, शिया सीड्स, सोयाबीन्स इत्यादींमध्ये हे आढळते.
व्हिटॅमिन डी (Vitamin D)
व्हिटॅमिन डी मूड नियंत्रित करण्यास आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, सतत आजारी पडणे, थकवा जाणवणे, केस गळती, उदास वाटणे, चिडचिडेपण वाढणे, स्थूलता येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काही पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळते.
व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ
दूध, कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या, मशरुम, सोयाबीन दूध, संत्री,गाजराचा रस, दही