व्यायाम करा
मन फ्रेश राहण्यासाठी माणसाला व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायामामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. व्यायाम ही एक अँटिडिप्रेशन प्रक्रिया आहे. म्हणून नियमितपणे व्यायाम करत जा.

गोड पदार्थ कमी खा
अति गोड खाण्यामुळे मेंदूत रासायनिक बदल होतात व ताण वाढतो. त्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाऊ नयेत.

मेडिटेशन करा
मेडिटेशनमुळे मनाला शांती मिळते. ताण-तणावासोबत जुळवून घेण्याची क्षमता वाढते. मेडिटेशनमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येते. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे मेडिटेशन करा.

आवश्यक झोप घ्या
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण रात्री उशिरा झोपतात. त्यामुळे निद्रानाश, आळस, चिडचिडेपणा वाढीस लागतो. निद्रानाश, चिडचिडेपणा यामुळे डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नेहमीच पुरेशी झोप घेत चला.

निसर्गाच्या सानिध्यात जा
निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने माणसाच्या मनावरील ताण हलका होतो. मन एकाग्र होते. रोज शक्य नसेल तरी माणसाने आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात, बगिच्यात अवश्य जावे.