शरीरात हिमोग्लोबिनची रक्ताची कमतरता (anemia) निर्माण झाली तर थकवा, अशक्तपणा जाणवतो. तसेच शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर हाडे कमकुवत आणि ठिसूळ (weak bones) होतात. जाणून घ्या मजबूत हाडे आणि रक्तवाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा –
दूध (milk)
दुधाला सुपरफूड म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. परिणामी शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढते. शिवाय हाडेही बळकट होतात.
गूळ आणि शेंगदाणे ( jaggery and peanuts)
गूळ आणि शेंगदाणे यांच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते. तसेच गूळ आणि शेंगदाणे यामंध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत बनतात.
पनीर (paneer)
पनीर हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
संत्री आणि आवळा (Orange and amla)
संत्री आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.
तीळ (Sesame)
तिळामध्ये कॅल्शियम सोबतच प्रथिने देखील असतात. नियमित तीळ बारीक चावून खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात. तसेच हाडे आणि दातही बळकट होतात.
खजूर (Dates)
खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते, परिणामी हिमोग्लोबिन वाढते.
विविध प्रकारीच्या डाळी (Different types of pulses)
विविध प्रकारीच्या डाळी या लोह आणि प्रथिनांचा देखील उत्तम स्त्रोत आहे. एक वाटी डाळीमध्ये जवळपास 6.25 मिली ग्रॅम लोह असते. डाळींमुळेरक्त तर, वाढतेच शिवाय हाडेही बळकट होतात.
हिरव्या भाज्या (Green Vegetables)
हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि जीवनसत्त्वांसह कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हाडे बळकट आणि मजबूत होतात. विशेषतः पालक हा कॅल्शियम आणि लोहाचा खूप मोठा स्त्रोत आहे. 100 ग्रॅम पालकमध्ये जवळपास 0.81 मिली ग्रॅम लोह असते. त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आहे, त्या लोकांनी त्यांच्या आहारात पालकचा समावेश करावा. शरीरातील लोह वाढले की रक्ताचे प्रमाण आपोआप वाढते.