पुदिना ही एक औषधी वनस्पती आहे. पुदिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो म्हणून उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
पुदिना खाण्याचे फायदे
पुदिन्याचे सेवन केल्याने पोटाची उष्णता कमी कमी होते तसेच पोट आणि अपचनाच्या समस्यांपासून पुदिन्याच्या सेवनाने अराम मिळतो.
तोंडाची दुर्गंधी येत असेल तर पुदिन्याची पाने सुकवून त्यांचे चूर्ण बनवा आणि या चूर्णाने दात घासा. या उपायाने तोंडाची दुर्गंधी जाईल शिवाय हिरड्याची मजबूत होतील.
पुदिन्याच्या पानांचा वापर पराठा, चटणी यांसारखे पदार्थ बनवताना केला तर, पदार्थ अधिक चवदार बनतात तसेच लवकर पचतातही.
पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्याचे काम करतात.
अॅंटीइन्फ्लामेंट्री आणि अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्मामुळे पुदिना त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुदिन्याची पाने बारीक करुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने डाग, खड्डे, मुरूम आदी समस्या कमी होतात.
गजकर्ण, खाज झालेल्या ठिकाणी पुदिन्याच्या पानांचा लेप करून लावा.
किडा किंवा कीटक आपल्याला चावल्यास तर त्वरीत त्या जागेवर पुदिन्याचा लेप लावल्याने वेदना कमी होतात.
उन्हाळ्यात तळपायांची आग होते अशा वेळी थंड पुदिन्याचा लेप करून तळपायांवर लावावा.
टॉन्सिल्सचा त्रास होत असेल तर पुदिन्याचा रस आणि पाणी एकत्र करून या पाण्याने गुळण्या करा.
आवाज बसला असेल तर पुदिन्याचा रस आणि थोडे मीठ एकत्र करून या पाण्याने गुळण्या करा.