दही खाण्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. शरीराची उष्णता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात दहीभात अवश्य खावा. जाणून घ्या दही-भात खाण्याचे इतर फायदे

वजन कमी होते
दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. तसेच दही भात खाल्ल्याने लगेच पोट भरत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

तात्काळ ऊर्जा मिळते
दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दह्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट इनफेक्शनला रोखण्यासाठी मदत करतात.

मेंदूची कार्यक्षमता वाढते
नियमित दही भात खाल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

ताणतणाव कमी होतो
अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट असतात. त्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे ताणतणाव सहन करण्याची करण्याची शक्ती वाढते.