पॅन कार्ड, आधार कार्ड आणि निवृत्ती वेतन, ईपीएस अर्ज, बँक लॉकर करार, इंडियन बँक स्पेशल एफडी, एसबीआयच्या अमृत कलश यांसारख्या कामांची शेवटची तारीख जूनमध्ये संपत आहे. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत. जाणून घ्या या कामाविषयी माहिती आणि शेवटी तारीख.
स्पेशल एफडी
इंडियन बँक FD “IND SUPER 400 DAYS” या विशेष एफडी अंतर्गत बँक सर्वसामान्यांसाठी 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठांसाठी 8 टक्के व्याज देत आहे. यामध्येही गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.
बँक लॉकर कराराची अंतिम मुदत:
आरबीआयने लॉकर कराराच्या नूतनीकरणाची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे, ज्यामध्ये 50 टक्के काम 30 जून आणि 75 टक्के काम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.
आधार-पॅन लिंक
पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख देण्यात आली होती, ती जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आधार कार्ड अपडेट
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार धारकांना 15 मार्च 2023 पासूनआधार तपशील ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची तरतूद केली होती. ही सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर मोफत आहे, तर आधार केंद्रांवर 50 रुपये शुल्क सुरू राहील.14 जून 2023 पर्यंत आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.
ईपीएस अर्ज
कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून जास्त पेन्शन घेण्यासाठी EPFO ने अर्जाची मर्यादा 26 जून 2023 पर्यंत वाढवली आहे.
एसबीआयच्या अमृत कलश स्पेशल एफडीची अंतिम तारीख 30 जून आहे. ही 400 दिवसांची FD आहे. सामान्य लोकांसाठी व्याज 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के व्याज आहे.