अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागासाठी मोठ्या घोषणा केल्या.

नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी भांडवली खर्चासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी

सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला रुग्णालये – हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारणार

ग्रामीण भागातील रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देणार, 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन वर्षात सुरु करणार, त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद

60 शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची उपचारपद्धती

8 मोबाईल कर्करोग निदान वाहने – 8 कोटी खर्च

आनंदीबाई जोशी यांना स्मरुण देशातील होतकरु विद्यार्थ्यांना इथेच प्रवेश मिळावा. मुंबईत सेंट जॉर्ज, नाशिक आरोग्य विज्ञान संस्था, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्था उभारणार

पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन टेक्नॉलॉजी- राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार

जालना इथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढे ही सेवा उपजिल्हा रुग्णालयातही उपलब्ध होईल.