गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतो तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग बनतो. आज गुरुवार, 25 मे रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग सर्वांत शुभयोग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्व आहे. जाणून घ्या गुरुपुष्यामृत योगाविषयी माहिती –

गुरुपुष्यामृत योग मुहूर्त
25 मे 2023 रोजी सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी सुरू होत आहे. तर सायंकाळी 5 वाजून 52 मिनिटांपर्यंत असणार आहे.

गुरुपुष्य योगामध्ये खरेदी केलेले सोने किंवा इतर संपत्ती नेहमी कायम राहते, त्यात कोणतीही कमी येत नाही, असे मानले जाते. यामुळे गुरुपुष्य योगात लोक सोने, चांदी, घर किंवा इतर संपत्ती खरेदी करतात, जेणेकरून ती संपत्ती कायम राहते.