- लवंग-
पोटदुखीचा त्रास होत असल्यास लवंग खा. कारण लवंग खाल्याने वेदना आणि अपचन दूर होते. तसेच हे मळमळ, उलट्या, गॅस कमी करण्यास मदत करते.
- केळी खा-
पोट दुखत असेल तर केळी खा. केळीमध्ये व्हिटॅमिन बी-6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पोट दुखत असेल तर केळ खावे.
- लिंबाचा रस प्या-
कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळून ते प्या. असे केल्याने पोट दुखणे बंद होते. लिंबामध्ये अम्लीय गुणधर्म असतात.
- आलं-
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स कमी करतात. हे पोटदुखीच्या वेदना कमी करू शकते.
- पुदिना-
पोट दुखत असेल तर पुदिन्याचे सेवन करा. पुदिना पचनास मदत करते. यामुळे वेदना कमी होतात. मळमळ होण्याचा त्रासही कमी होतो.