नखांच्या आसपास असणाऱ्या उती सतत नखं कुरतडल्याने कमजोर पडतात आणि या उती योग्य पद्धतीने वाढणे बंद होते. त्यामुळे नखांखाली मॅटिड्ढ नावाचा थर डॅमेज होऊन नखांचा आकार बिघडतो.
नखे खाल्ल्याने नखातील घाण तोंडावाटे शरीरात जाऊन पोटाचे विकार वाढू शकतात.
नखे खाल्ल्याने शरीरात ह्युमन पेपिलोमा नावाचा व्हायरस पसरतो. यामुळे हात, तोंड आणि ओठावर मस येऊ शकते.
नखे कुरतडल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो. यामुळे बोटांना सूज येऊन ते लाल होऊ शकतात.