केस जर रुक्ष, कोरडे आणि निर्जीव असतील तर केस गळणे-तुटणे, फाटे फुटणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. केस सदृढ आणि निरोगी होण्यासाठी त्यांच योग्य प्रकारे पोषण पण होणं गरजेचे आहे. त्यासाठी योग्य आहार तर हवाच शिवाय केसांना पोषण मिळण्यासाठी नियमितपणे मालिश पण करावी. तेलाने केसांना मालिश केल्यानेही पोषण मिळते मात्र तुपाने केसांना मालिश केल्याने अधिक फायदा होतो.

केसांना तूप कसे लावावे

केस धुण्यापूर्वी कोमट तूप केसांना लावावे. हलक्या हाताने केसांना थोडा वेळ मालिश करावी. एक तासानंतर केस धुवून टाकावेत.
रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही केसांना कोमट तुपाने मालिश करून सकाळी केस धुवू शकता.

केसांना तूप लावण्याचे फायदे

केसांचा निर्जीवपणा, रुक्षपणा कमी करून तूप केसांना हायड्रेट करते.
केसांना नैसर्गिक चमक मिळते.
केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.
तूप केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
केसांतील डँड्रफ कमी होतो.
केसांची वाढ लवकर होते.
केस मुलायम बनतात.

टीप – केसांना लावण्यासाठी वापरण्यात येणारे तूप शुद्ध असावे. त्यात भेसळ किंवा केमिकल नसावेत.