प्रवास करताना अनेकांना मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास होतो. त्यामुळे अनेकजण लांबचा प्रवास टाळतात. परंतु यावर काही घरगुती उपाय आहेत. ते केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
लिंबाचा वास घ्या
प्रवासादरम्यान मळमळ होत असेल तर सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मोठा श्वास घ्या. तसेच आपले विचार दुसरीकडे वळवा.
प्रवासात जाताना लिंबू सोबत घेऊन जा. अधून मधून लिंबाचा वास घ्या. तसेच प्रवासात ज्यावेळेस तुम्हाला उलट्यांचा त्रास होईल तेव्हा लिंबू चाखा.
आलं
प्रवासात ज्यावेळेस उलट्यांचा त्रास होईल तेव्हा आलं खा.
लवंग
प्रवासाला निघण्याआधी गरम पाण्यात एक चमचा लवंग उकळून ते गाळून प्या. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांपासून आराम मिळतो.
लिंबू पाणी
प्रवासादरम्यान उलट्या होत असतील तर लिंबू-पाणी प्या. महत्त्वाचं म्हणजे लिंबू पाणी जास्त प्रमाणात पिऊ नका.
संत्र्याचा रसही उलट्या रोखण्यासाठी फायद्याचा आहे. तसेच संत्री खाल्ल्यानेही फरक जाणवतो.
मीठ आणि साखरेचे पाणी
मीठ आणि साखरेचे पाणी पिल्यानेही त्रास कमी होतो.
बंदिस्त वातावरणात मळमळ जाणवते. त्यामुळे प्रवासात बस किंवा गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील.