चष्मा वापरत असताना नाकावर डाग पडतो. जिथे नाकावर चष्मा असतो ती जागा काळसर पडते. मग हा डाग कसा घालवायचा असा प्रश्न पडतो. त्यासाठी काही सोप्पे उपाय आहेत. ते एकदा करून पाहाच.
– ऍलोवेरा जेल
ऍलोवेरा जेल डाग पडलेल्या ठिकाणी लावा. काही वेळ ते तसेच ठेवा. नंतर धुवून टाका. हा नैसर्गिक उपाय आहे.
– काकडी
चेहऱ्यावर असलेल्या डागांसाठी काकडी हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी काकडी घ्या अन् तिचे भाग कापा. नंतर ते कापलेले भाग फ्रीजमध्ये ठेवा. आता ते भाग काढून डाग असणाऱ्या भागावर ठेवा.
– बदाम तेल
रात्री झोपण्याआधी चष्म्यामुळे डाग पडलेल्या भागावर बदामाचे तेल लावल्याने फायदा होतो.
– गुलाब पाणी
गुलाब पाणी घ्या. त्यात व्हिनेगर मिसळा. ते मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण डाग असणाऱ्या भागांवर लावा.