अनेकदा स्वयंपाक घरात कामाच्या गडबडीत नजरचुकीने हात किंवा त्वचा भाजली जाते. या भाजलेल्या भागावर त्वरित उपाय न केल्यास फोड येण्याची शक्यता असते. भाजलेल्या त्वचेचा दाह कमी करण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करू शकता.
- भाजलेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावा. त्वचेचा दाह कमी होतो.
- थंड पाण्यातून कपडा भिजवून पिळून घेऊन भाजलेल्या त्वचेवर ठेवा. थोड्या वेळाने पुन्हा हीच कृती करा. यामुळे त्वचेचा दाह कमी होतो.
- भाजलेल्या त्वचेवर एखादी अँटिसेप्टिक क्रीम लावावी.
- भाजलेल्या त्वचेवर थंड पाण्याची बाटली किंवा बर्फ कापडात गुंडाळून त्या ठिकाणी लावा.
भाजलेल्या त्वचेवर मध लावा. मधामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे त्वचेची आग कमी होते. शिवाय भाजलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत नाही. - भाजलेल्या त्वचेची आग कमी झाल्यानंतरही परत त्या जागी धक्का लागल्यास किंवा गरम पाण्याचा संपर्क आल्यास पुन्हा त्वचेची आग, जळजळ होणे सुरु होते. त्यामुळे गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.
- बटाटा किंवा गाजराचा लेप भाजलेल्या ठिकाणी लावू शकता. तसेच बटाटा किंवा गाजराचा रसही भाजलेल्या त्वचेची आग कमी करण्यास मदत करते. गाजरामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते तर, भाजलेल्या ठिकाणचे डाग बटाट्यामुळे कमी होतात.
भाजलेल्या त्वचेवर खालील गोष्टी करणे टाळा
- तूप, तेल कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये.
- भाजलेल्या त्वचेला कापूस किंवा कापडाने झाकू नका.
- जखमेवरील फोड फोडू नये.
टीप – जास्त प्रमाणात भाजले असेल किंवा जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमच्या सौंदर्यातच नाही तर, आरोग्यातही भर घालतो गुलाब; जाणून घ्या महत्वपूर्ण उपयोग