अनेक कारणांनी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. काही घरगुती उपायांनी देखील हे डाग घालवता येतात. त्यासाठी महागड्या ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. मात्र हे उपाय नियमितपणे केले पाहिजेत.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

1) लिंबू

i ) लिंबाचा रस कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. (तुमची स्कीन अधिक सेसेंटिव्ह असल्यास लिंबाच्या रसात मध मिसळू शकता.)
ii ) चेहऱ्यावर डाग असणाऱ्या ठिकाणी लिंबू , टोमॅटो आणि व्हिनेगर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका.

2) मध

i ) काळे डाग किंवा त्वचेवर जखमा असणाऱ्या ठिकाणी मध लावा.
i i ) मध आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावरील काळ्या डागांवर नियमित लावा.
iii ) मधामध्ये मुलतानी माती मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.

3) चंदन

चंदन पाण्यात किंवा गुलाबजलमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा. हा उपाय नियमितपणे केल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात.

4) बटाटा

बटाट्याच्या चकत्यांनी हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

5) कोरफड

कोरफडीचा रस चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावा. हा उपाय रोज सकाळ-संध्याकाळी करा.